म्युझिक लव्हर्स ग्रुप आणि ग्रामीण पत्रकार संघ व नमो फाऊंडेशन यांच्या वतीने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम संपन्न
म्युझिक लव्हर्स ग्रुप आणि ग्रामीण पत्रकार संघ व नमो फाऊंडेशन यांच्या वतीने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : दि . २७ / म्युझीक लव्हर्स ग्रुप , ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य ,नगर आणि नमो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत प्रजासत्ताक दिन निमित्ताने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम बाजार समितीचे शेतकरी निवास यांच्या सहकार्याने मार्केट यार्ड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. जन गण मन या राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली . म्युझिक लव्हर्स ग्रुप मार्फत विविध गाजलेली सुप्रसिद्ध देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली .
श्री . शिरिष बेगडे ,विनय गुंदेचा, पंढरीनाथ लांडगे, मनिष मुथ्था, संजय वायकर , किशोर बनसोडे, राजु क्षेत्रे, किरण वैकर, राजु क्षेत्रे सर या सगळ्या हौशी कलाकारांनी मराठी व हिंदी गीते गायली .
महंमद रफी, मुकेश, उदित नारायण, शंकर महादेवन, महेंद्र कपूर, हृदयनाथ मंगेशकर, रुपकुमार राठोड, हेमंत कुमार, अरिजीत सिंग अशा अनेक प्रसिद्ध गायकांची गाणी सादर करण्यात आली . जहाँ डाल डाल पर, शूर आम्ही सरदार आम्हाला, तेरी मिट्टी मे मिल जावाँ , छोडो कल कि बातें , श्रम बाळांनो आठवुनी, भारत का रहेनेवाला हु , मेरे देश की धरती , ये देश वीर जवान का , ओ देश मेरे , संदेसे आते है अशी विविध गाणी सादर केली .
जन गन मन या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली . श्री .किरण वैकर यांनी सुत्रसंचालन केले तर श्री .विनय गुंदेचा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले . यावेळी अनेक महिला व नागरिक मान्यवर रसिक उपस्थित होते . सर्व संगीतप्रेमी रसिकांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला .