डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेची उज्वल यशाची परंपरा

डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेची उज्वल यशाची परंपरा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
वसंतनगर ता.पारोळा —-वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर ता. पारोळा येथील इयत्ता बारावी कला /विज्ञान शाखेची निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही 98.63% टक्के निकाल लागला असून यात :-
प्रथम क्रमांक: स्वाती किशोर जाधव 83.63% ,द्वितीय क्रमांक:- कृष्णा सुभाष चव्हाण 80 %, तृतीय क्रमांक:- दिव्या धनराज राठोड 79.83 %
*कला शाखेत*
प्रथम क्रमांक:- चेतन सट्टू जाधव 73.17%, द्वितीय क्रमांक:- पवार अविनाश श्याम 71.83%, तृतीय क्रमांक – पवार कोमल रामदास 70.50% मिळविले. या परीक्षेत 36 विध्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविलेले तर प्रथम श्रेणीत 60 विध्यार्थी व द्वितीय श्रेणीत – 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वरील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊसो. सुभाष देशमुख जाधव,प्राचार्य श्रीमती. एल. एस. पाटील , मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे ,प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर वसंतनगर, पिंपळकोठा, भोलाणे येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचेही कौतुक केले आहे.