Breaking
ब्रेकिंग

सेंद्रिय शेती व संशोधन केंद्रात प्रशिक्षणार्थींसाठी एक दिवसीय ‘आर्थिक ज्ञान व्यवस्थापन’ प्रशिक्षण संपन्न.

0 8 6 5 2 0

सेंद्रिय शेती व संशोधन केंद्रात प्रशिक्षणार्थींसाठी एक दिवसीय ‘आर्थिक ज्ञान व्यवस्थापन’ प्रशिक्षण संपन्न.

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सेंद्रिय शेती व संशोधन केंद्र प्रशिक्षण हॉल येथे एक महत्त्वपूर्ण एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. हा कार्यक्रम किसान मित्र फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या लघुउद्योग मंत्रालय (MSME) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य विषय ‘आर्थिक ज्ञान व्यवस्थापन तसेच उद्योगासाठी कर्ज व शासकीय योजनेचा लाभ’ हा होता. कार्यक्रमाला एकूण ५० प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन:
या प्रसंगी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. प्रियंका नालकर गाडे मॅडम यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना आर्थिक व्यवस्थापन आणि शासकीय योजनांबद्दल सखोल व बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच, रिनोव्हेट इंडिया मुंबईच्या मृणाली ठाकूर मॅडम यांनीही आपले महत्त्वपूर्ण विचार मांडून उद्योगासाठी कर्ज कसे उपलब्ध करावे, याविषयी तांत्रिक व व्यावहारिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे यश:

हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसान मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर अडसुरे साहेब, तसेच मोरे साहेब, किरण विधाटे साहेब आणि गायत्री माने मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण व कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांना आपल्या उद्योगाची आर्थिक घडी बसवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे