पंचायत समितीचे भावी उमेदवार गहिनीनाथ उर्फ दादासाहेब दरेकरच का…?
दादासाहेब दरेकर आणि अभिलाषा घिगे पाटील जोडीची चर्चा मतदारांची पसंती ठरते लक्षवेधी..!!!
पंचायत समितीचे भावी उमेदवार गहिनीनाथ उर्फ दादासाहेब दरेकरच का…?
थोडक्यात संघर्ष इतिहास पाहुया…
दादासाहेब दरेकर आणि अभिलाषा घिगे पाटील जोडीची चर्चा मतदारांची पसंती ठरते लक्षवेधी..!!!
विकास कामांसाठी पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटीलाचे पाठबळ सहकार्याच्या जोरावर जोडी सुसाट…..
अहिल्यानगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के
नगर तालुक्यातील एका छोट्या खेडेगावातील एका साधारण शेतकरी कुटुंबातील तरुणांचं नाव गहिनीनाथ किसनराव दरेकर हा तरुण शालेय जिवना पासून धाडसी व कर्तबगार व वडिलांना आपला मुलगा पैलवानकी मध्ये नाव गाजवले अशी अपेक्षा होती.शालेय जीवना नंतर जबाबदारीची वयांत नगर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शारीरिक मजबूत व्यायाम मुळें तब्येत जोरावर गहिनीनाथ किसनराव दरेकर उर्फ दादासाहेब दरेकर यांनी सुरक्षारक्षक सुपरवायझर (गार्डची) नोकरी स्वीकारली आणि काही काळ या ठिकाणी नोकरी सुरू असताना शेतकरी वर्ग दादाकडे आपल्या समस्या घेऊन जात दादा तिथे सगळं काम सोडून संबंधित शेतकरी कुठं काम अडल तिथं जात बिनधास्त संबंधित अधिकारी कडुन शेतकरयांचे शालेय तरुणांचे काम मार्गी लावुन देतं असे कामांच्या ठिकाणी दादा कमी आणि शेतकरी गावकरी शालेय तरुण समस्या सोडविण्यासाठी पुढं असतं मग या ठिकाणी मन न लागल्याने दादा चांगल्या पगाराची नोकरी सोडून
दादांनी तरुणांना एकत्र करत शिवमुद्रा ग्रुप नावाने मोठं संघटना उभारले अल्पावधीतच नगर तालुक्यातील पुढारी नेते मंडळीच लक्ष वेधून आपलं कामाचा ठसा उमटवला होता.मग या संघटनेच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तालुकाध्यक्ष पदा पासून राजकीय कार्यला सुरवात झाली पण मागील पंचायत समिती निवडणूक वेळी पक्षीय तिकिट न मिळाल्याने दादासाहेब दरेकर खचले नाही अपक्ष लढत ४ हजार पुढे मत मिळवत आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केले. राजकीय वारसा नाही.राजकीय अनुभव नाही पैसा नाही तरी समाज कार्य जोरावर एवढी मत मिळवली नगर तालुक्यातील राजकीय पुढारी लक्षांत आलं हे वादळ आता रोखता येणार नाही.
या पराभवानंतर समाजकारणाचा कामांचा खंड पडला नाही. तरुणांच्या आग्रही भूमिकांमुळे रामसत्य लाॅन या ठिकाणी दादासाहेब दरेकर वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजन करण्यात आले यावेळी स्वर्ग आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.या वेळ दादासाहेब दरेकर वाढदिवसाच्या कार्यक्रम साठी गुंडेगाव गणातील अलोट गर्दी पाहून त्यावेळी साहेब बोले दादा आता तुला गुंडेगाव गणात कोणी रोखू शकत नाही.त्या वेळी जनतेतून टाळ्या कडकडाटात झाला होता. कर्डिले साहेब कडे राजकीय पारख करणं हि कला होती राजकीय भविष्यवाणी तेव्हा सांगीतली हे साहेब चांगल्याप्रकारे ओळखत असे दादासाहेब दरेकराच्या अनेक कामाच्या आठवणी साहेबांनी उजाळा दिला त्या वेळी राजकीय वातावरण निवडणूका नव्हत्या जे सामन्य नागरीक तरुण फक्त दादासाहेब दरेकर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आले होते. संगळे आपापल्या आपल्या परीनं खर्चाने एवढा जनसमुदाया एकवटला होता संपूर्ण लाॅन खचुन भरला होता. या वेळी उपस्थित दादा गुंडेगावत गणात अपक्ष निवडणूक सुध्दा सहजपणे पार पाडु शक्य होणारं हे तेव्हा फायनल झाले.जनतेच्या मनातला उमेदवार होण्याची दादासाहेब दरेकर आजही गेली ९-१० वर्ष सातत्याने झटत आहे.उन वारा पाऊस थंडी कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता दादा सकाळी पासून संध्याकाळी १ वाजेपर्यंत जनसामान्यांच्या सेवा समस्या सोडविण्यासाठी उभा आहे.
दादासाहेब दरेकर आपल्या पत्नी मुलांना सांगतात मी निवडुन आलो तर समाजांचा नाही तरच तुमचा
आपल्या सामाजिक कार्याच्या कामांच्या माध्यमातून दादासाहेब दरेकर हे नाव एक कणखर नेतृत्व कोरलं या कामाची झलक स्वर्ग आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी या तडफदार तरुणांची कामांची झलक भावली आमदार कर्डिले यांनी दादासाहेब दरेकर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन केले या जन सामान्य प्रश्न साठी धडपड करणारा तरुण भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षी जबाबदार सोपावल्या कमी कालावधीत तालुक्यातील विविध गावांतील तरुणांची फळी उभारली पक्ष संघटना मजबूत साठी प्रयत्न केले.या कामांची पावती म्हणून भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष पदांची जबाबदारी सोपावली आज हि जबाबदारी दादा व्यवस्थित सदर जबाबदारी सांभाळुन सामान्य नागरिकांचे प्रश्न विद्युत ट्रान्स्फर जळाला, घरगुती भांडणे सुध्दा दादा माध्यमातून सोडवले जात आहे. नदीला पुर आला शाळेतील समस्या, नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या आधी राज्य मार्ग होता या रस्त्यावर खड्डे माहामार्ग म्हणून ओळख निर्माण झाली पावसाळा नगर सोलापूर रस्त्यावरील खड्डे हे एक समीकरण झाले होते. नगर ते रुईछत्तीसी अंबिलवाडी परिसरात खडृडे खड्डे पडत या खड्ड्यात अनेक अपघातात होत होते. या विरोधात दर वर्षी दादासाहेब दरेकर आणि दादासाहेब दरेकर मित्र गजुभाऊ भांडवलकर मित्र परिवार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी फैलावर घेत आंदोलन पुकारत असे अनेक वेळा या आंदोलनात चिघळण्याची परिस्थिती निर्माण होत असे. सार्वजनिक विभागाचे अधिकारी कार्यालय डाबुन रोष व्यक्त केला जात होता या आंदोलनामुळे नगर सोलापूर रस्त्यावरील खड्डे प्रश्न मार्गी लागत असे कोणाचा हाॅस्पिटल प्रश्न असेल दादा संबंध हाॅस्पिटल मध्ये जाऊन बिल कसे कमी ह़ोईल या साठी प्रयत्न करत असे मग जर हाॅस्पिटल जर नियमानुसार दर दाखवायला लागलें तर मग दादासाहेब दरेकर पत्रकारांना घटनास्थळी बोलावून लुट करणारे हाॅस्पिटल वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आक्रमक भूमिका घेत असे हि भुमिका पुढे सदर हाॅस्पिटल बील तडजोड करत असे असे समाज हिता मध्ये दादासाहेब दरेकर नेहमी अग्रेसर भुमीका राहिली आहे. शिराढोण गावच्या नदीवर मांडवा गावांला जोडण्यासाठी गाव ४ कोटी रुपये पुलं मंजुरीसाठी दादासाहेब मंत्रालयात अनेक चक्करा माराव्या लागल्या.शिराढोण गावाचे उपसरपंच पद माध्यमातून दादांनी शिराढोण गाव विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर मागासलेल्या गावात गणना होत होती. परंतु दादासाहेब दरेकर यांनी गावाच्या राजकारणात लक्ष घातल्यामुळे शिराढोण गावांचा विकासाची दिशा बदली अनेक कामं वैयक्तिक खर्चाच्या माध्यमातून करून घेतली गावातील रस्ते रुंदीकरण केले. स्मशानभूमीत प्रश्न मार्गी लागला. गावात बाजार सुरू केला पण आर्थिक उलाढाल कमी पडल्याने व्यापारी वर्ग माघारी फिरले. दादांनी शिराढोण गावांसह वृध्द जेष्ठ नागरिक बसण्यासाठी अनेक बाकडे, अनेक गावांत हायमॅक्स दिवे, बसुन दिले.खासदार डॉ सुजय विखे पाटीलाच्या माध्यमातून अपंग जेष्ठ नागरिक साहित्य मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. राजकीय विरोधक फक्त राजकीय भांडवली म्हणून मागील काही कुरापती उचपाचक माध्यमातून बदनाम करण्यासाठी अनेक डावपेच आखले जाता आहे. दादांनी विकास काम चांगले करत असल्याने शिराढोण गाव दादांच्या पाठिशी भक्कम उभा आहे.
येणार्या पंचायत समिती निवडणुकीसाठी दादासाहेब दरेकर हे गुंडेगाव गणातील फिक्स सदस्य असणार यांत शंका घेण्यासारखे काही नाही असे मत ज्येष्ठ नागरीकासह तरुण बोलत आहे. दहिगाव येथील एका गरीब कुटुंबात जुळे अपत्य जन्माला आलो अहिल्यानगर हाॅस्पिटल येथे या पेशंट चे दिड लाखाच्या आसपास बील झाले पण या कुटुंबातील कमवता सदस्यांनी दादासाहेब दरेकर यांनी सदर घटना सांगितली दादांनी तात्काळ हाॅस्पिटल गाठले आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करून सदर पेशंटचे फक्त ५० हजार रुपये बील भरून पेशंट घरी सोडले अशा अनेक कुटुंबांना वैद्यकीय आथिर्क आधार मदत करण्यासाठी दादासाहेब दरेकर हे रात्रंदिवस समाजकारण करत आहे.
आज एक राष्ट्रीय पक्ष छोट्या गावातील उमेदवाराला पक्षाचं तिकीट हे समाजकारणाच्या जोरावर देत आहे. दादासाहेब दरेकर हे पंचायत समिती सदस्य रूपाने आपणं पाहणारं आहोत असं गुंडेगाव गणातील मतदार बोलत आहे…
विजयी भवो असा आशिर्वाद दादांना दररोज भेटतं आहे…..


