ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे महिलादिन साजरा

ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे महिलादिन साजरा
अलिबाग / प्रतिनिधी :राजेश बाष्टे
ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली या संस्थेतर्फे आंतर राष्ट्रीय महिला दिन संस्थेच्या वाघोली येथील कार्यालयात ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. प्रयास हास्पिटलच्या संचालिका डा. सौ. रेखा म्हात्रे
(M. B. B.S.) प्रमुख वक्त्या होत्या तर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष दामोदर ठाकूर होते.
प्रारंभी संस्थेचे सल्लागार बळवं त वालेकर यांनी प्रमुख अतिथी डा डाॕ. रेखा म्हात्रे यांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
डाॕक्टर सौ. म्हात्रे यांनी आपल्या भाषणात महिलादिनाचे महत्त्व विशद करताना कुटुंबात महिलेचे स्थान किती महत्त्वाचे आहे , हे सांगितले . स्त्रिया पहाटे ५ पासून रात्री ११ वाजेपर्यंत विविध कामांमध्ये दँग असतात . पण त्यांच्या कामाचे मूल्य कोणीही करीत नाही.सतत काम पण विश्रांती नाही . यामुळे त्यांना अनेक रोग जडतात. मधुमेह , ह्रुद्रोग , कॕन्सर इ. रोगांचा त्यात समावेश असतो. पण बहुतेक महिला रोग अंगावर काढतात . म्हणून त्या रोगाच्या बळी ठरतात, असे सांगून त्या म्हणाल्या प्रक्रुतीची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून वेळौवेळी डाॕक्टरचा घ्या व आयुर्मान वाढवा. आनंदी राहा. असाही सल्ला त्यांनी दिला.
यावेळी सल्लागार बळवंत वालेकर यांचेही भाषण झाले. शासनाने महिलांना कसे झुकते माप दिले आहे , ते त्यांनी सोदाहरण विशद केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर , सेक्रेटरी दत्तात्रेय नांदेकर , सह सेक्रेटरी अच्युत पाटील खजिनदार जनार्दन पाटील , सह खजिनदार मधुकर पाटील एकनाथ राघो म्हात्रे , श्रीमती नंदा महादेव नांदेकर , श्रीमती लिलाबाई पाटील ,
श्रीमती पुष्पलता पाटील ,
सौ.पुष्पा दामोदर ठाकूर , सौ. यशोदा शांकर पाटील , सौ. वासंती अरूण पाटील , सौ. शैला शरद ठाकूर , सौ. वासंती प्रभाकर वर्तकचृ , सौ. हर्षदा रोहन वर्तक , सौ. शकुःतला बाळाराम पाटील , सौ. सुशिला रामचंद्र पाटील , प्रकाश पाटील,
(वाघोली) प्रदीप पाटील (भायमळा) , अनःत वर्तक इ. १०० महिला व पुरुष सदस्य उपस्थित होते .