Breaking
ब्रेकिंग

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक

स्नेहबंधतर्फे सन्मानपत्र देत डॉ. उद्धव शिंदे यांनी केले अभिनंदन

0 8 6 5 2 1

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक

स्नेहबंधतर्फे सन्मानपत्र देत डॉ. उद्धव शिंदे यांनी केले अभिनंदन

अहिल्यानगर : पोलीस दलातील दीर्घकालीन, कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्र सरकारच्या वतीने अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
“पोलीस दलातील दीर्घकालीन, कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत अमितेश कुमार यांना मिळालेले अतिउत्कृष्ट सेवा पदक हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वातून आणि सेवाभावातून समाजसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळते. त्यांच्या पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे प्रतिपादन डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या सन्मानामुळे अमितेश कुमार यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेतील योगदानाचा गौरव झाला आहे. कार्यक्षम नेतृत्व, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. अमितेश कुमार यांच्या कार्यातून पोलीस दलातील नव्या पिढीला प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे