आंबेगावमध्ये ‘विक्टोरियस कार’चे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न
सिनेअभिनेत्री आशु सुरपुर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
आंबेगावमध्ये ‘विक्टोरियस कार’चे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न

सिनेअभिनेत्री आशु सुरपुर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
पुणे / प्रतिनिधी
आंबेगाव येथील मारुती सुझुकी विक्टोरियस शोरूममध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या कारचे भव्य लोकार्पण सोहळा जल्लोषात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन लोकप्रिय सिनेअभिनेत्री आशु सुरपुर आणि सिनेअभिनेता यातीन कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास शोरूमचे व्यवस्थापक अभिजीत चव्हाण, सचिन ओमप्रकाश किंगर, किरण घोलप, तसेच चैगुले इंडस्ट्रीजचे मालक उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि वाहनप्रेमींची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली.
सिनेअभिनेत्री आशु सुरपुर यांनी नव्या कारबद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले,“ही कार अतिशय आकर्षक असून तिचा लुक आणि परफॉर्मन्स दोन्ही प्रभावी आहेत. जो कोणी नवीन कार घेण्याचा विचार करत आहे, त्याने ‘विक्टोरियस’ कार नक्की अनुभवावी. तसेच आंबेगावमधील या शोरूमला एकदा अवश्य भेट द्यावी,” असे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या आनंदात आणि नव्या कारच्या झगमगाटात पुण्यातील आंबेगाव परिसरात या सोहळ्याने उत्साहाचे नवे वातावरण निर्माण केले.


