नेट, सेट ,पेट उत्तीर्ण पोलिसाने घेतली स्वेच्छानिवृत्ती

नेट, सेट ,पेट उत्तीर्ण पोलिसाने घेतली स्वेच्छानिवृत्ती
पुढील आयुष्यात समाजसेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार – – पो .हे .कॉ .सुनिल महाजन
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : पोलीस खात्याच्या कामाच्या व्यापामुळे एका उच्च शिक्षित पोलिसाने वयाच्या ४५ व्या वर्षी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. पुढील आयुष्यात समाजसेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.अमळनेर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन २००४ साली पोलीस खात्यात रुजू झाले. ते इतिहास ,इंग्रजी आणि जनरल अशा तीन विषयात पदवीधर आहेत. त्यांचे शिक्षण एम ए डीएड पर्यंत झाले असून नेट सेट आणि पेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना लिखाणाची देखील आवड आहे.२४ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी कुटुंबासह पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पोलीस खात्यातील कामाच्या व्यापामुळे शारीरिक व मानसिक त्रास होतो म्हणून वैयक्तिक कारणामुळे मला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असा अर्ज दिला. पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सुनील महाजन यांना २ जून २०२५ पासून स्वेच्छा निवृत्तीला परवानगी दिली आहे. सुनील महाजन निवृत्तीनंन्तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे मानसिक रुग्ण , निराधार व्यक्ती, वृद्ध ,अबला महिला ,अनाथ व्यक्ती यांच्यासाठी समाजसेवेचे काम करणार असून त्यांच्यासाठी लिखाण करणार आहे.