Breaking
ब्रेकिंग

शेवगाव पोलीसांची दोन अवैध धंद्यावर धडक कारवाई गावठी दारुच्या हातभट्या केल्या उध्दवस्त

0 3 9 0 2 0

 

प्रतिनिधी : महेश चव्हाण

शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत दि- 05/11/2024 रोजी सकाळी 06/00 वा.चे सुमा. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत फोनव्दारे माहीती मिळाली की, शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु. भिल्लवाडा वस्ती येथे दोन पुरष गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायण व गावठी हातभट्टीची दारु तयार करुन तिची विक्री करत आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा रचुन सदर पुरुष आरोपी हे पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीच्या कब्जातील 44500/- रु.किंमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायण व गावठी हातभट्टीची तयार दारु विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगतांना मिळुन आली असुन दोन्ही आरोपीं विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे पुढील प्रमाने वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. 1) फिर्यादी नामे पोकाँ/1752 भारत बाजीराव अंगारखे नेमणुक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन गु.र.नं. 913/2024 महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम 65(फ),(ई) प्रमाणे आरोपी नामे गणेश छबुराव पवार वय 40 वर्षे रा.भिल्लवाडा वस्ती आव्हाणे बु.ता.शेवगाव व 2) फिर्यादी नामे-पोकाँ /926 संतोष हरिभाउ वाघ नेमणुक शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 914/2024 महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम 65(फ),(ई) प्रमाणे आरोपी नामे विकास रामदास वाघमारे वय 32 वर्षे रा.भिल्लवाडा वस्ती ता.शेवगाव यांचेवर दिनांक-05/11/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिल दोन्ही गुन्ह्यातील आरोपींकडे 44500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जागीच नाश करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो.अ.नगर,मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अ.नगर ,मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, पोसई विशाल लहाणे, पोहेकाँ किशोर काळे, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोहेकाँ परशुराम नाकाडे, पोना आदिनाथ वामन, पोकाँ शाम गुंजाळ, पोकाँ बप्पासाहेब धाकतोडे, पोकाँ संतोष वाघ, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ भारत अंगारखे, पोकाँ आदिनाथ शिरसाठ, पोकाँ राहुल आठरे यांनी केली असुन पुढील तपास पोहेकाँ नेताजी मरकड हे करत आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे