नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार

नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नूतन जिल्हाधिकारी डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासनिक अनुभव आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत सेवाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असेच काम ते अहिल्यानगर जिल्ह्यात करतील, अशी अपेक्षा डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. आशिया यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
जिल्ह्यातील विकास प्रक्रियेत नवे धोरणात्मक बदल होतील. जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील विकास कामे, कृषी आणि पाणीपुरवठा प्रकल्प, तसेच नागरी सुविधांसंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत. नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. पंकज आशिया हे जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील विकास कामे, कृषी आणि पाणीपुरवठा प्रकल्प, तसेच नागरी सुविधांसंबंधी अनेक महत्त्वाच्या कामांना गती देतील. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकास प्रक्रियेत नवे धोरणात्मक बदल होतील, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.