रात्री फिरणारे ड्रोन बाबत अफवा पसरू नये याकरिता पोलीस मित्रांची मदत
*रात्री फिरणारे ड्रोन बाबत अफवा पसरू नये याकरिता पोलीस मित्रांची मदत*
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्था व राहुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील रात्री फिरणारे ड्रोन याबाबत अफवा पसरून गैरसमजातून कोठेही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जागरूकता आणण्यासाठी नागरिक व पोलीस यांना तत्काळ मदत व्हावी करिता पोलीस मित्र म्हणून राहुरी फोटोग्राफर सामाजिक संस्था ने पुढाकार घेतला असून सदर बाबत कोणाला काही माहिती द्यायची असेल तसेच सदर बाबत कोणाची काही शंका असेल तर सदर बाबत राहुरी फोटोग्राफर सामाजिक संस्था मदत करणार आहे .तसेच पोलीस मित्र म्हणून पोलीस व नागरिक यांना सहकार्य करणार आहे
सदर बाबत राहुरी फोटोग्राफर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुलदीप नवले सचिव गणेश नेहे उपाध्यक्ष बाबा जाधव, महेश शिंदे, किरण शिंदे, गंगाधर गीते ,संजय गायकवाड ,सचिन गाडे, दीपक गुलदगड ,संकेत येवले ,मंगेश गाडेकर ,संदीप वाणी प्रकाश बोबडे, शुभम भोसले, शिवाजी लांडगे, देवराज मंतोडे, संदीप भांड, सचिन वराळे, अभी आगाव, रज्जाक पठाण ऋषिकेश देशमुख, श्री केदार, आशिष बडदे, बाळासाहेब बाळासाहेब सावंत सावंत सर्व संचालक सदस्य मोठ्या संख्येने हजर होते सदर बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या समवेत मीटिंग घेण्यात आली .मीटिंग बाबत वरिष्ठांशी चर्चा करून सर्व फोटोग्राफर यांना पोलीस मित्र म्हणून काम करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे .
तसेच बहुतेक ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत हळदीचे कार्यक्रम तसेच डीजेचे कार्यक्रम होतात तरी सदर ठिकाणी रात्री 10 नंतर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे .
सदर आवाहनास प्रतिसाद देऊन राहुरी फोटोग्राफर सामाजिक संस्थेने सहमती दर्शवली आहे तसेच नागरिकांमध्ये ड्रोनबाबत निर्माण झालेला संभ्रम संदर्भात आपल्या गावातील फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर जे पोलिस मित्र म्हणून कार्य करणार आहे त्यांच्या सोबत संपर्क साधावा. असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.
नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरून जाऊ नये तसेच चोरीच्या घटना व ड्रोन याचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
——————–
मदतीसाठी
डायल 112
राहुरी पोलीस स्टेशन
2426232433
वर संपर्क करावा
——————–


