Breaking
ब्रेकिंग

नारायणडोहो तलाव ओव्हर-फ्लो

0 8 6 5 0 8

नारायणडोहो तलाव ओव्हर-फ्लो

नारायणडोहो:-प्रतिनिधी : रफिक शेख

नारायणडोहो अहिल्यानगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावरील नारायणडोहो येथील तलाव रविवारी (२८ सप्टेंबर) संद्याकाळी ओव्हर-फ्लो झाला.

तुडुंब भरलेला या ७०० एकर क्षेत्राच्या तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली असली, तरी ग्रामपंचायत, तलाठी प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नगर शहरापासून 12

किमी अंतरावर या तलावाच्या ओव्हर फ्लोमुळे परिसरातील गावांमध्ये आनंदाची लहर उसळली असली, तरी या परिसरातील वाढलेल्या झाडांमुळे भिंतीला धोका उद्भवू शकतो.
मागील आठवड्यापासून टाकळी व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे नारायणडोहो तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. त्यामुळे नारायणडोहो टाकळी काझी, सारोळा बद्धी,उक्कडगाव परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षामुळे तलावाच्या भिंतीकडे दुर्लक्ष होत आहे नेमले कर्मचारी यांनी तलावाच्या ठिकाणी झाडे झुडपे वाढत आहे या कडे लक्ष देण्याची गरज आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे