Breaking
ब्रेकिंग

पीएम किसान उत्सव कार्यक्रमाचे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथून थेट प्रक्षेपण ;  माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते 24 व्या पीएम किसान हप्त्याचे वितरण

0 8 9 6 7 2

पीएम किसान उत्सव कार्यक्रमाचे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथून थेट प्रक्षेपण ;  माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते 24 व्या पीएम किसान हप्त्याचे वितरण

*दहिगाव-ने येथून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण*

 

*पीएम किसान उत्सव कार्यक्रमाचे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथून प्रक्षेपण*

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २४ वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी, बनासकाटा (गुजरात) येथे झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आला. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या पीएम किसान उत्सव या कार्यक्रमात देशातील ९.३४ कोटी पेक्षा अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना रु. १८६८० कोटीपेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी कृषि क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषि अवसंरचना कोष (AIF) योजनेच्या अंतर्गत ५२१ प्रकल्प व १२ फलोत्पादन क्लस्टर्स चे उद्घाटन केले व देशाला समर्पित केले. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेवासा व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

प्रमुख कार्यक्रम सुरू होण्याअगोदर उपस्थित शेतकऱ्यांपैकी निवडक शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीस अनुकूल रब्बी हंगामासाठी शिफारसीत व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेले ज्वारीचे “परभणी सुपर मोती” (SPV-2407) हे वाण शेतावरील तंत्रज्ञान चाचणीसाठी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. केव्हीके दहिगाव-ने चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी बद्दल मार्गदर्शन केले. परभणी सुपर मोती हे वाण अवर्षणप्रवण भागातील आणि भारी जमिनीसाठी हा वाण अत्यंत उपयुक्त, ११८ ते १२० दिवस कालावधीचे व कणसाचे दाणे टपोरे, मोत्यासारखे शुभ्र आणि आकर्षक असून हेक्टरी ३१ ते ३३ क्विंटल उत्पादन देते. तसेच याची कडब्याची प्रत देखील उत्तम असल्याचे डॉ. कौशिक यांनी सांगितले. काही निवडक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शिफारस असलेले व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले कांदा पिकाचे “फुले-स्वामी” हे वाण प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले. उद्यानविभागाचे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे यांनी कांदा पिकावर मार्गदर्शन करताना फुले स्वामी या वाणाची टिकवणक्षमता व आकर्षक रंग हे महत्वाचे गुणधर्म असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना विषय विशेषज्ञ डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी मार्गदर्शन केले. जनावरांच्या स्तनदाह रोग नियंत्रणासाठी ५% प्रोव्हीडीन आयोडीन डीप कप व जनावरांमधील दुग्धज्वर नियंत्रणासाठी डीकॅड खनिजे तंत्रज्ञान या प्रात्यक्षिकांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाचे साहित्य प्रदान करण्यात आले. रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर कृषिविद्या विभागाचे शास्त्रज्ञ नारायण निबे यांनी मार्गदर्शन केले.

खेती बचाव अभियान अंतर्गत व मा.आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ. चंद्रशेखरजी घुले पाटील तसेच श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहे. शेतातील कोणत्याही पिकाचे अवशेष जसे, ऊस पाचट, कापसाच्या पऱ्हाट्या, केळीचे बुंधे शेताबाहेर फेकून देऊ नये व जाळू नये. या शेतातील पिक अवशेषांचे रुपांतर आच्छादन व सेंद्रिय खतात करण्यासाठी तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक ट्रॅक्टरचलित यंत्रे जसे ऊस पाचट कुट्टी यंत्र, बनाना श्रेडर, कॉटन श्रेडर इ. चा वापर करण्याचे आवाहन विषय विशेषज्ञ इंजि. राहुल एस. पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमास केव्हीके दहिगाव-ने चे सर्व शास्त्रज्ञ, कर्मचारी व परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विषय विशेषज्ञ इंजि. राहुल एस. पाटील व आभार माणिक लाखे यांनी मानले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे