गुंडेगाव येथे बिबट्या मृत अवस्थेत आढळला…
*गुंडेगाव येथे बिबट्या मृत अवस्थेत आढळला…*
वाळकी / प्रतिनिधी
गुंडेगाव वडघुल रस्त्यालगत वन हद्दी लगत बिबट्या मृत अवस्थेत आढळला गुंडेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बीटमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला ह्याचा शोध वन विभाग घेत असुन कोतकर मळा (खरडी) गावापासून अगदी २ किमी अंतरावरील रडतोंडी रस्त्यावर एका शेतात शनिवार २० सप्टेंबर रोजी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळीच मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी वन अधिकारी एस आर बडदे, वनकर्मचारी ए. एम. गाडेकर,वनरक्षक ए.आर. खेडकर, पशुवैद्यकीय अधिकारी स्नेहा जगदाळे, आर, पी, शेळके वनमजूर संदीप ठोबरे,राम भोसले यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदर बिबट्याचा मृत्यू हा वन्य प्राण्यांच्या झटापटीत झाल्याचे प्रथम दर्शनी सांगितले असुन पुढील शवविच्छेदन अहवालानंतर खरे मृत्यूमुखी पडलेल्या बिबट्याचे कारण समोर येईल.असे वन अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब जावळे, साहेबराव सकट, बाळासाहेब आगळे यांच्या उपस्थित सदर बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले..



