न्यू लॉ कॉलेजचे वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत दैदिप्यमान यश

न्यू लॉ कॉलेजचे वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत दैदिप्यमान यश
अहिल्यानगर / प्रतिनिधी
अहिल्यानगर : नुकत्याच पार पडलेल्या न्यू आर्टस, कॉर्मस ॲण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर आयोजित कॉ. एकनाथराव भागवत राज्यस्तरीय आंतर महाविदयालयीन वादविवाद -वक्तृत्व स्पर्धेत न्यू लॉ कॉलेजची विदयार्थीनी कु. संपदा लांडगे आणि दिग्विजय येवले / आठरे यांनी व्दितीय क्रमांकाचा मानाचा करंडक मिळवून महाविदयालयाच्या सांस्कृतिक विभागाची मान उंचावली. तसेच पेमराज सारडा महाविदयालय आयोजित शारदा करंडकाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपदा लांडगे आणि विकास ज-हाड यांनी मिळवून महाविदयालयाचे नाव उज्वल केले. या स्पर्धेत लांडगे आणि ज-हाड व्यतिरिक्त कु.ऋतुजा गावडे हिने उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविले त्यांना प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एल मोरे, प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबददल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे अध्यक्ष श्री. रामचंद्रजी दरे, उपाध्यक्ष मा. डॉ. विवेक भापकर, सचिव मान. ॲड. विश्वासरावजी आठरेपाटील, सहसचिव श्री. मुकेश माधवराव मुळे, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे पाटील आणि सर्व विश्वस्त आणि कार्यकारणी सदस्य यांनी अभिनंदन केले .


