Breaking
ब्रेकिंग

हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी

0 3 9 0 3 5

हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :-  अमळनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आज भाविकांनी मारुती मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आल. हनुमान जयंतीनिमित्त मंदिरावर मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली होती. दर वर्षाप्रमाणे यावर्षीही हनुमान जयंतीनिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. महिला व पुरुष यांची मोठ्या प्रमाणात सहभागी होते. भक्तीमय अस वातावरण झालेल होत.दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. संध्याकाळी भाविकांसाठी भजन संध्या हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता.या कार्यक्रमाला सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. वसुंधरा लांडगे मॅडम सुरेख आवाजात भजन संध्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. शहरातीलच काय आजूबाजूतील खेड्यातील भाविक सुद्धा दर्शनाला आले होते. अंबर ऋषी टेकडीवर 22 फुटी हनुमानची मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गेले होते. अमळनेर शहरात डुबकीच्या मारुती येथे व धान्य मार्केट याठिकाणी भंडारा प्रसादाचे आयोजन भाविकांसाठी करण्यात आले होते.तसेच अनेक ठिकाणी राञी किर्तनाचे आयोजन भाविकांसाठी करण्याता आलेले
होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे