Breaking
ब्रेकिंग

सामाजिक कार्यकर्ते डॉ . उद्धव शिंदे यांनी उन्हापासून बचावासाठी गरीबांना वाटल्या टोप्या

स्नेहबंध सोशल फाउंडेशनचा उपक्रम

0 8 6 7 0 2

सामाजिक कार्यकर्ते डॉ . उद्धव शिंदे यांनी उन्हापासून बचावासाठी गरीबांना वाटल्या टोप्या

स्नेहबंध सोशल फाउंडेशनचा उपक्रम

प्रतिनिधी : धीरज लांडगे

अहिल्यानगर | यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. गोरगरीब, रस्त्यावर कचरा वेचणाऱ्यांचे उन्हापासून आपले संरक्षण करता यावे म्हणून यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहराच्या विविध भागात गरीब नागरिकांना टोप्या वाटप केल्या. या उपक्रमातून स्नेहबंधने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. शहरातील सावेडी, सिव्हिल हॉस्पिटल, दिल्लीगेट, माळीवाडा, स्वस्तिक चौक, मार्केट यार्ड, आनंदधाम, स्टेशन रोड परिसरात उन्हात फिरणाऱ्या गरीबांना टोप्या देण्यात आल्या. यावेळी माजी प्राचार्य एकनाथ जगताप, प्रतिक डहाळे, स्वयंम बास्कर, प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते. उन्हाच्या तीव्रतेत डोक्यावर संरक्षणासाठी अनपेक्षितपणे टोपी मिळाल्याने नागरिकांनी हात जोडून स्नेहबंधचे आभार मानले. 

उन्हात बाहेर पडताना टोपीचा वापर करावा

उन्हापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने टोपी वापरावी, शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नये, तसेच सकाळी किंवा सायंकाळी उशिरा कामांची विभागणी केली जावी व आवश्यक काम असेल तर उन्हात बाहेर पडताना टोपीचा वापर करावा, उन्हाचा त्रास होत असल्यास सावलीत थांबावे, असे आवाहन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे