Breaking
ब्रेकिंग

राहुरी फॅक्टरीत अगस्ती ऋषी महाराजांच्या पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप

0 8 6 5 2 1

राहुरी फॅक्टरीत अगस्ती ऋषी महाराजांच्या पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप

 

राहुरी तालुका जावेद शेख

 

टाळमृदूगांच्या निनादात,

कपाळी बुक्का, गळ्यात तूळशीची माळ, हातात भगवी पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर फुलांनी सजविलेले तूळशीवृंदावन घेऊन मुखी पांडुरंगाचा नाम जप सुरु असलेल्या महिला भगिनी आणि पुष्पहारांनी सजविलेल्या पालखी रथातून अकोले येथील अगस्ती ऋषि महाराजांची पायी दिंडी पांडुरंगाच्या भेटीला आषाढीवारीसाठी निघाली असून सोमवारी राहुरी फॅक्टरी येथे आली असता पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले.

 

प्रारंभी परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी डीजेच्या निनादात व टाळ मृदुंगाच्या गजरात नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व गुरुकुल वसाहत परिसरातील नागरिकांनी ठेका धरला होता. गणपती मंदिर प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला. वारकऱ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी अगस्ती महाराज दिंडी सोहळ्यातील ह.भ.प राजेंद्र महाराज नवले, ह.भ.प दीपक महाराज देशमुख यांच्यासह संत मंडळींचा सन्मान करण्यात आला.

 

प्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड,आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम,राहुरी अर्बन निधीचे रामचंद्र काळे, योग गुरू किशोर थोरात, नगरसेविका सुजाता कदम,नगरसेवक बाळासाहेब लोखंडे,ऋषभ लोढा,ह.भ.प संपत काका जाधव,गजानन घुगरकर,ह.भ.प बाबा महाराज मोरे,सतीश संसारे,दत्तात्रय गागरे आदींनी दिंडी सोहळ्यास भेट दिली.

 

यावेळी पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उपाध्यक्ष अरुण गायकवाड, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे, राजेंद्र सोनटक्के, विलास अल्हाडे, बाळासाहेब भालेराव, शंकर गावडे, पंकज ढुमणे,संजय बानकर,संतोष राऊत, नंदकिशोर काळाने, नामदेव पेरणे, मनोज अल्हाडे, पारस नहार, गणेश शेजुळ, पद्माकर निघूते, कुणाल तनपुरे,राजेंद्र जोशी आदींसह परीसरातील भाविक व तरुण मंडळ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे