प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानला “महाराष्ट्र एनजीओ आयकॉन अवॉर्ड २०२५” पुरस्कार प्रदान
प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानला “महाराष्ट्र एनजीओ आयकॉन अवॉर्ड २०२५” पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ११/ रावगांव येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानला ज्ञानरचना सोशल फाउंडेशन ठाणे महाराष्ट्र या संस्थेतर्फे दिला जाणारा “महाराष्ट्र एनजीओ अवॉर्ड 2025 ” दि.११ फेब्रुवारी रोजी माऊली संकुल सावेडी अहिल्यानगर येथे भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई सोमा पोपेरे यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेवक व सी. ए. शंकर घनश्यामदास अदानी यांनी केले. यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, प्रथमता: मी ज्ञान रचना सोशल फाउंडेशन चे आभार मानतो फाउंडेशनच्या माध्यमातून दिला गेलेला पुरस्कार अत्यंत तळागळामध्ये काम करणाऱ्या संस्थेचा व कार्यकर्त्यांचा पुरस्कार आहे. पुरस्कारामुळे भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली आहे. भविष्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य कसं करता येईल हाच संस्थेचा संकल्प असेल असे कांबळे म्हणाले.
यावेळी मुक्त पत्रकार / लेखिका सरोज आलाट, स्पर्श सेवाभावी संस्थेचे खजिनदार अमोल आलाट, स्पर्श सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितल साळवे, ज्ञानरचना सोशल फाउंडेशन च्या डायरेक्टर सौ. सुप्रिया चौधरी, ज्ञानरचना सोशल फाउंडेशन चे डायरेक्टर नितीन साळवे, ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या डायरेक्ट श्रीमती सारिका शेलार आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.