वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे होळी व धूलिवंदनचे आयोजन संपन्न
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे होळी व धूलिवंदनचे आयोजन संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे होळी धूलिवंदन चे औचित्य साधून आज होळी व धूलिवंदन चे आयोजन करण्यात आलेले होते. संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते होळीची पुजा करुन होळीचे दहन करण्यात आले. तसेच प्राचार्या गायत्री भदाणे मॅडम यांनी मुलांना होळी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. कारण या दिवशी हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करणारा दिवस म्हणजे होळी तसेच होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सणाचे महत्त्व सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरी केली, त्या नंतर स्नेहभोजनाचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, विजय चौधरी, सखाराम पावरा, यांनी सहकार्य केले .



