Breaking
ब्रेकिंग

करमाळयात गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्यावतीने गणेश जयंती उत्सव व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी

0 3 9 0 7 1

करमाळयात गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्यावतीने गणेश जयंती उत्सव व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३/ करमाळा येथे गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्यावतीने गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. तसेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तुच सुखकर्ता तू दुखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया या गजराच्या निनादांमध्ये करमाळा शहरातील वेताळपेठ येथील गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबच्या वतीने गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला. यंदाचे मंडळाचे रौप्य महोत्सव वर्ष असून सर्व जाती धर्माचे लोकांनी यामध्ये सहभागी होऊन गणेश जयंती एक आनंद उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केली. हिंदू मुस्लिम एकात्मतेचे एकमेव उदाहरण गजानन सोशल अ़ॅन्ड स्पोर्ट्स क्लब आहे. गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ध्येय ठेवून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत उत्सव आनंदात पार पाडला.

गणेश जयंती निमित्ताने सकाळी आठ ते एक या वेळेमध्ये गणेश याग सहस्त्र आवर्तन होमहवन श्री गणेशाची आरती करून त्यांना महाप्रसाद देऊन नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला. या वर्षीही गजानन स्पोर्ट्स क्लबच्या महाप्रसादाचा करमाळा शहरातील नागरिकांनी महिला भगिनीं, चिमुकल्याबरोबर जेष्ठ नागरिक मान्यवर मंडळीनी लाभ घेतला. या गणेश जयंतीचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी श्री गणेशाला वंदन करून या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. पाच ते साडे पाच हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. यावेळी महिलांची महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाच्या व गणेश उत्सवाच्या कार्यामध्ये यंदाच्या वर्षी बाल गोपाळ यांनी विशेष सहभाग नोंदवला असून गजानन स्पोर्ट्स क्लबचे बाल सदस्यही या कार्यामध्ये सहभागी झाले होते.

गजानन सोशल स्पोर्टर्स क्लब परंपरा यशस्वीपणे चालवण्यासाठी पुढची पिढीही कामाला लागली हे बघून विशेष आनंद वाटत असल्याचे अध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सांगितले गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबच्या गणेश जयंती उत्सवामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गणेशाची दर्शन घेऊन गजानन स्पोर्ट्स क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करून महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रशांत ढाळे यांनी गणेश जयंती उत्सव सुरू करून करमाळा शहरात भक्तीमय वातावरण निर्माण केले आहे सामाजिक एकता जपण्यासाठी हे कार्य नक्कीच समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या या कार्याचे अनुकरण करून करमाळा शहरांमध्ये अनेक मंडळांनी गणेश जयंती उत्सव साजरा करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले आहे.

गजानन क्रिकेट क्लबच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सामन्यात अंतिम सामना गजानन क्रिकेट क्लब करमाळा विरुद्ध अ़ॅड. शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत अहिल्यानगरच्या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १ लाख रुपये व चषक पटकावले तर द्वितीय पारितोषिक आयोजक गजानन क्रिकेट क्लब करमाळा यांनी ७५ हजार रुपये रोख रक्कम व चषक पटकावले. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मॉर्निंग क्रिकेट क्लब टेंभुर्णी तसेच चौथ्या क्रमांकाचे बक्षीस केसीसी क्रिकेट क्लब यांनी पटकाविले. अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार राहुल यास मिळाला. तो मालिकावीर देखील ठरला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सचिन गायकवाड यास पुरस्कार देण्यात आला.

यावेळी आयोजक गजानन सोशल व स्पोर्टस क्लबचे प्रशांत ढाळे, रविंद्र वळेकर, सचिन घोलप, संजय सावंत, अतुल फंड इं. उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे