प्रमोद डफळ यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ जाहीर

प्रमोद डफळ यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ जाहीर
राहुरी तालुका जावेद शेख
दि. २५ मे २०२५, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात नावाजलेले मराठी हिंदी दैनिक अहिल्याराज द्वारा वर्धापन दिन तसेच पुण्यश्लोक – अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५’ साठी राहुरी खुर्द येथील प्रमोद डफळ यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद डफळ यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड चे आयोजन करण्यात येते यामध्ये विविध क्षेत्रात कर्तृव घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ साठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश (अमरावती) संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणारे प्रमोद डफळ यांची निवड पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील इंडियन एक्सलन्स अवार्ड साठी करण्यात आली असून त्यांना यापूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आली आहेत. दिनांक १ जून २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉल मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते प्रमोद डफळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळतात त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.