जनता विद्यालयाची प्रियंका गोरे हिचा सत्कार संपन्न;नीट परीक्षेत देशात ११११वी रँक प्राप्त ..

जनता विद्यालयाची प्रियंका गोरे हिचा सत्कार संपन्न;नीट परीक्षेत देशात ११११वी रँक प्राप्त ..
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रियंका बबन गोरे हिने नीट परीक्षेत ७८५ पैकी ६०० गुण मिळवून संपूर्ण भारतात ११११ वी रँक मिळवली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार संस्थेचे विश्वस्त श्री मुकेशदादा मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
रुईछत्तीशी येथील शेतकरी कुटुंबातील सेंट्रींग कामगार असलेले बबन दत्त गोरे यांची मुलगी प्रियंका बबन गोरे हिने आपल्या अभ्यासाच्या व नीट परीक्षेत संपूर्ण भारतात ११११ रँक मिळवली आहे. सरकारी कोट्यातून एमबीबीएस होण्याचे तिचे स्वप्न साकार होणार आहे. प्रियंका ही जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईछत्तीशीची विद्यार्थिनी असून मार्च २०२४ मध्ये दिलेल्या परीक्षेत तिला ७९ टक्के गुण प्राप्त झाले होते.
याप्रसंगी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात जनता विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, सहावी व सातवी ज्ञानवर्धिनी परीक्षा, नववीतील एन एम एम एस परीक्षेतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा तसेच चित्रकला व बी टी एस या परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त श्री मुकेशदादा मुळे हे होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री दत्ता पाटील नारळे,पर्यवेक्षक सौ. तारा पाडळकर, किरण भापकर,बंटी मोढवे,प्रवीण गोरे, अंकुश गोरे, सोमनाथ गोरे, बबन गोरे, राम दरंदले, गणेश गोरे, सोमनाथ जगदाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.