Breaking
ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.अरुण तुपविहीरे सर यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

0 8 6 7 0 3

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.अरुण तुपविहीरे सर यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

राहुरी तालुका जावेद शेख

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरीचे उपक्रमशील मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांना अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन नुकतेच गौरविले आहे .हा कार्यक्रम अहिल्यानगर येथे नुकताच पार पडला .
पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे,शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी ( योजना) बाळकृष्ण बुगे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित सर इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने, सहसचिव डॉ.उल्हास सुर्वे ,खजिनदार महेश घाडगे , राजेंद्र राठोड , प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे ,उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा. जितेंद्र मेटकर ,सुरेखा आढाव,घनश्याम सानप, यांनी अभिनंदन केले.

सावित्रीबाई फुले विद्यालयाचे तुप विहीरे यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळल्यापासून विद्यालयात अनेक नाविण्यपूर्ण बदल केले आहेत.
विज्ञान शिक्षक असल्याने विद्यालयात गणित प्रयोगशाळा,आकाश निरीक्षणासाठी दुर्बीण सुविधा तसेच विद्यार्थी गुणवत्तेसाठी अनेक उपक्रम राबवले आहे .या उपक्रमाची नोंद म्हणून विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन 15 लाखाचे बक्षीस मिळाले आहे .राहुरी तालुका गणित विज्ञान संघटनेचे ते कार्यअध्यक्ष असून अनेक शाळेत जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे सप्रयोग ,हसत खेळत विज्ञान , विज्ञान कार्यशाळा घेणे असे अनेक ते उपक्रम ते राबवत आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे