Breaking
ब्रेकिंग

गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाचा गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने संपन्न

0 7 6 9 4 1

गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाचा गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने संपन्न

राहुरी / प्रतिनिधी : जावेद शेख

राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन सोहळा पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या स्वरात व वारकरी परंपरेच्या उर्जेत सहभागी होत गणरायाला निरोप दिला. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने मंगलमय झाला.

शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. चैतन्य वारकरी शिक्षण संस्था, जोगेश्वरी आखाडा येथील ह.भ.प. गोपीनाथ महाराज वरपे यांच्या उपस्थितीत संस्थेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंग व भजनाच्या तालावर मिरवणूक मार्गस्थ केली. गोटुंबे आखाडा येथील भजनी मंडळही या मिरवणुकीत सहभागी झाले. लहान मुलांपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणेश विसर्जन सोहळ्याला पारंपरिक व उत्साहाचे स्वरूप दिले.

या सोहळ्यास डॉ. अण्णासाहेब बाचकर, जालिंदर गडधे, ह.भ.प. आदिनाथ महाराज दवणे, पत्रकार रमेश खेमनर, संतोष कराळे, सुरेंद्र आदमाने, राहुल बाचकर, अंकुश दवणे, तेजस बाचकर, आकाश डहाळे, अक्षय डहाळे, राजन सुसे, तुषार सुसे, आदित्य कराळे, कार्तिक बाचकर, सोन्याबापु बाचकर, बापू होडगर, पंकज पवार, संजय धोत्रे, सिद्धार्थ सुसे, चैतन्य सुसे, देवेंद्र गिते, महेंद्र मराठे, रसूल शेख, आकाश खेमनर, अजिंक्य आदमाने, सचिन बाचकर आदींसह गावातील अनेक मान्यवर व गणेशभक्त उपस्थित होते.

तसेच गावातील महिला रंजना दवणे, सविता गडधे, अनिता बाचकर, संगीता सुसे, रेणुका सुसे, सुनीता सुसे, शीतल दवणे, मंगल डहाळे, सुमन काळे, शोभा निमसे यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून, टाळ-मृदुंगाच्या गजरात व भजन-कीर्तनांच्या सुरावटींनी सजलेल्या या विसर्जन मिरवणुकीने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. भक्ती व एकतेचे दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे