Breaking
ब्रेकिंग

आताची युवा पिढी भविष्यातील शेतकरीच-शेतकरी नेते सुनील देवरे*

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पारोळा तालुका युवा अध्यक्षपदी योगराज लोहार*

0 3 9 0 7 2

*आताची युवा पिढी भविष्यातील शेतकरीच-शेतकरी नेते सुनील देवरे*

*महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पारोळा तालुका युवा अध्यक्षपदी योगराज लोहार*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

पारोळा :- देशामध्ये सद्यस्थितीला शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसून येत आहे त्यामुळे सर्वच जण शिक्षणाकडे वळताना दिसत आहे शिक्षण घेणे चुकीचे नाही ती आनंदाची बाब आहे परंतु प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळेल याची कुठेही शाश्वती नाही आणि कंपनींमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा दुर पर्यंत संबंध नाही. त्यामुळे बरेचशे शेतकऱ्यांची पोरं परत शेतीकडे वळताना दिसत आहे म्हणून आत्ताची युवा पिढी ही भविष्यातील शेतकरीच आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्यामुळेच शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांच्या पोरांनी शिक्षण घेत असताना शेतीलाही तेवढेच महत्त्व दिलं पाहिजे जेवढे शिक्षणाला देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये शेती शिवाय पर्याय राहणार नाही म्हणून संघटनेच्या माध्यमातून युवकांनी व युवतींनी संघटित होऊन शिक्षण व्यापार व शेतीशी निगडित उद्योग उभारून आपला विकास केला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते पारोळा तालुका युवा अध्यक्षपदी योगराज लोहार यांच्या नियुक्तीच्या कार्यक्रमात बोलत होते.
पारोळा शहरासह तालुक्याच्या युवा आघाडी च्या तालुकाध्यक्षपदी गोंधळ वाडा, पारोळा येथे राहणारा योगराज चंद्रकांत लोहार यांची निवड करण्यात आली यावेळेस मालखेडा आरोग्य प्रमुख महेश पाटील, पारोळा शहरातील निलेश महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.
योगराज लोहार यांच्या निवडीसाठी पारोळा तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, मृदा व जलसंधारण समितीचे तालुकाध्यक्ष एस.झेड.पाटील,कायदा व सुव्यवस्था समितीचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात तर लोहार यांनी पुर्ण तालुक्यामध्ये युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन उभे करेल अशा आश्वास्त केले.
तरी राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा याकरिता व या कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत. यात पुरुष, महिला, युवक,युवती,कामगार, व्यापारी या आघाडींचा समावेश आहे.
नियुक्ती पत्रात आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी पारोळा तालुका युवा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहचून शेतकरी हीत जपणार अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद केलेले आहे तसेच ज्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत सामील होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करायचे असेल अशांनी 9890875238 या नंबरवर संपर्क करावा असे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे