राज्यस्तरीय लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे १२ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत

राज्यस्तरीय लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे १२ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
राज्यस्तरीय लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयाने परीक्षेस बसविलेल्या ,आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित; जय बजरंग प्राथमिक विद्यालय, पाईपलाईन रोड, अहिल्यानगरचे १ ली ते ७ वी पर्यंतचे १२ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले ते पुढीलप्रमाणे ; चि. दर्शन गणेश घुले याने इ २ री (१५० पैकी १४४) गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला. तर कु. आराध्या कैलास मेहेत्रे इ.२ री हिने (१५० पैकी १४२ ) गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. चि. ईशान दीपक घुले इ. १ ली १५० पैकी १३४ गुण मिळवून जिल्हा यादीत दुसरा क्रमांक पटकावला तर कु. आयुश्री दीपक ढवळशंख इ २ री हिने १५० पैकी१३६ गुण मिळवून जिल्हा यादी तिसरा क्रमांक पटकावला . कु. शिवन्या गणेश कुसाळकर इ २ री १५० पैकी १२६ गुण मिळवून जिल्हा यादीत आठवा क्रमांक पटकावला. कु.अंजली रवींद्र आव्हाड १ ली १५०पैकी १२० गुण मिळवून नववा क्रमांक पटकावला. चि. सिद्धेश अमोल क्षीरसागर इ .५ वी ३०० पैकी २५२ गुण मिळवून जिल्हा यादीत बारावा क्रमांक पटकावला. चि. अभिषेक प्रभाशंकर कुशवाह इ ६ वी ३०० पैकी २५० गुण मिळवून जिल्हा यादीत तेरावा क्रमांक पटकावला. कु.स्वरा रवींद्र आव्हाड इ १ ली हिने जिल्हा यादीत पंधरावा क्रमांक पटकावला. चि.प्रथमेश अशोक वारे १ ली (१५० पैकी १०८) गुण मिळवून जिल्हा यादीत सोळावा क्रमांक पटकावला. कु. श्रावणी संतोष पानकडे इ.४ थी (३०९ पैकी २५०) जिल्हायादीत एकोणिसावा क्रमांक पटकावला. कु. श्रीलेखा गणेश आडसरे इ .४ थी (३००पैकी २३०) गुण मिळवून जिल्हा यादीत 29 वा क्रमांक पटकावला. *या सर्व* *यशस्वी* *विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी फिरोदिया सर* *सहसचिव उमेश गांधी सर* *व्यवस्थापक आशुतोष घाणेकर* सर ,यांनी अभिनंदन केले .
तर विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर सर यांनी सर्व* विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .