पारगाव मौलाच्या चिमुकल्यांसाठी उघडले ‘आशेचे द्वार’
पुण्याच्या प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप; विद्यार्थ्यांचे भविष्य होणार प्रकाशमान
पारगाव मौलाच्या चिमुकल्यांसाठी उघडले ‘आशेचे द्वार’
पुण्याच्या प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप; विद्यार्थ्यांचे भविष्य होणार प्रकाशमान
नगर / प्रतिनिधी
नावातच सकारात्मकता असलेल्या पुणे येथील ‘आशेचे व्दार प्रतिष्ठान’ने नगर तालुक्यातील पारगाव मौला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खरोखरच आशेचे नवे द्वार खुले केले आहे. संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, वॉटर बॉटल, नोटबुक्स, पेन, पेन्सिल आणि रबर किट अशा संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.नव्या कोऱ्या साहित्यासोबतच चॉकलेट आणि बिस्किटे मिळताच मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पवार, खजिनदार प्रशांत खावडिया, सचिव सचिन जाधव, सुपरवायझर रघुनाथ हुंबरे, स्वयंसेवक दीपक क्षेत्रे व ग्रामपंचायत सदस्य अमोल खेडकर उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ साहित्यिक कवी बाळासाहेब नेटके, प्रा. गोरख अंबरीत, सामाजिक कार्यकर्त्या कविता नेटके आणि नवनाथ बोठे यांनी उपस्थित राहून संस्थेच्या या कौतुकास्पद कार्याचा गौरव केला.शाळेचे मुख्याध्यापक सुभाष धामणे व शिक्षिका रुखिया तांबोळी यांनी आभार मानले.
पुण्याच्या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पंखांना दिलेले हे बळ कौतुकास पात्र ठरत आहे.


