शहर पाणी पुरवठयाची मुख्य जलवाहिनी फुटली
शहराच्या मध्यवर्ती भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार
शहर पाणी पुरवठयाची मुख्य जलवाहिनी फुटली . .
शहराच्या मध्यवर्ती भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार . . .
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा सतत खंडीत होत असलेला विज पुरवठा व मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार आहे .
दि .१८/०५/२०२६ रोजी सकाळी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेची ११०० एम. एम. व्यासाची मुख्य जलवाहिनी देहरे रेल्वे ओव्हर ब्रीज जवळ फुटल्याने सदर जलवाहिनी द्वारे शहरासाठीचा पाणी उपसा बंद पडलेला आहे . तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असुन मुळानगर पंपींग स्टेशन येथील राहुरी फिडर वरून होणारा विज पुरवठा ११.०० ते ११.१५ दरम्यान खंडीत झालेला होता. तद्नंतर
विळद पंपीग स्टेशन येथे एम आय डी सी फिडर होणारा विज पुरवठा दुपारी २.१५ ते ३.१५ दरम्यान खंडीत झालेला होता.
मागील काही दिवसांपासून शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शहरासाठीचा दैनंदिन पाणी उपसा कमी होत आहे . त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे .
यामुळे मंगळवार दि.१९/०५/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास बुधवार दि.२०/०५/२०२६ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .तसेच बुधवार दि.२०/०५/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार दि.२१/०५/२०२६ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .
तरी सदयस्थितीत शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे .


