ब्रेकिंग
राज्यअथलेटिक स्पर्धेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचे नेत्रदीपक यश
0
8
6
7
0
4
राज्यअथलेटिक स्पर्धेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचे नेत्रदीपक यश
प्रतिनिधी : संवेद वायकर
कोपरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेमध्ये ज्ञानसंपदा शाळेतील एकूण सात विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी ज्ञानसंपदा शाळेतील शिवदीप मोरे या विद्यार्थ्याने 9.57 मीटर गोळा फेकून राज्यात चौथा क्रमांक पटकावला.
अगदी कमी वयामध्ये सातत्यपूर्ण सराव व चिकाटी यामुळे हे घवघवीत यश संपादन केल्यामुळे शिवदीप याचे अहिल्यानगर जिल्ह्यातून तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवांजली अकोलकर, संस्थेचे विश्वस्त यांच्याकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
शिवदीप ला क्रीडा शिक्षक गोरक्ष धात्रक, मच्छिंद्र साळुंके, विकास परदेशी यांचे मोलाचे योगदान लाभले.

0
8
6
7
0
4



