Breaking
ब्रेकिंग

रोटरी क्लब अ.नगर तर्फे शाळांना पाण्याच्या टाक्या भेट

0 7 6 9 3 7

*रोटरी क्लब अ.नगर तर्फे शाळांना पाण्याच्या टाक्या भेट*

अहिल्यानगर प्रतिनिधी:- शिवा म्हस्के

ग्रामीण भागातील पाणी टंचाई प्रश्न लक्षांत घेऊन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर (प्रियदर्शनी)या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा माळीवाडा, जिल्हा परिषद शाळा तांदळी वडगाव, श्रीराम राम हायस्कूल दहिगाव श्री जगदंबा विद्यालय शिराढोण, या ग्रामीण भागातील शाळांना पाचशे लिटर पाण्याच्या टाक्यांचे वितरण रोटरी क्लबच्या अध्यक्षा अनुराधा आठरे, व रोटरी सर्व्हिस प्रोजेक्ट हेड सविता काळे, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले,
याप्रसंगी अध्यक्ष आठरे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाणी टंचाई विचार करता व शाळेतील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने कर्तव्य म्हणून या टाक्यांचे वितरण केले आहे. त्याचबरोबर जल है. तो कल है! जल नाही तो कल नाही| असे पाण्याचे महत्त्व विशद केले. तसेच रोटरी हेड काळे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रम आयोजक अनुराधा आठरे यांचे कौतुक केले, अशी माणसे दुर्मिळ असल्याचे सांगून पाण्याला जीवन म्हणतात या बाबत पाण्याचे महत्त्व व काटकसर करण्याचें आव्हान करून झाडे लावा झाडे जगवा असे आव्हान केले. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अनुराधा आठरे, किरण आंधळे, विष्णू, स़भाजी म्हस्के डॉ अंकुश वाघ,नेटके, यांनी करून कार्यक्रम पाहुणे आभार मदन गांगर्डे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे