Breaking
ब्रेकिंग

गांधली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सव पर्व साजरे

0 3 9 0 7 2

गांधली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सव पर्व साजरे

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर गांधली येथे संपन्न होत असून खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव पर्व साजरा करण्यात आले.याप्रसंगी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की आपल्यासाठी संविधान हे अतिशय पवित्र आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून प्रेरणा घेऊन संसदेपर्यंत माझं स्वतःचे नेतृत्व तयार करण्यात योगदान मिळाले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सक्रिय कामकाज करून स्वतःचा विकास करावा असे आवाहन केले .यावेळी हिरालाल पाटील, चेतन पाटील, स्वप्नील पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. अनिता खेडकर, प्रा डी आर ढगे, डॉ सागर राज चव्हाण यांनी महाविद्यालयातर्फे स्वागत केले. सुत्रसंचलन रासेयो स्वयंसेवक सागर कोळी यांनी केले तर आभार डॉ.अनिता खेडकर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे