यश गणेश नगरकर खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी
हावरा, पश्चिम बंगालमध्ये झाल्या स्पर्धा

यश गणेश नगरकर खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी
हावरा, पश्चिम बंगालमध्ये झाल्या स्पर्धा
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : नुकत्याच हावरा, पश्चिम बंगालमध्ये दि. ११ जुलै, २०२५ ते दि.१३ जुलै २०२५ रोजी खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये श्री. रामकृष्ण एज्युकेशन इंग्लिश मडियमचा विद्यार्थी चि. यश गणेश नगरकर याने ब्रांझ पदक मिळविले.
यश याने या अगोदर मागील महिन्यातच २९ जून २०२५ रोजी अमरावती येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्यात सुध्दा नैपुण्य यश मिळविले आहे. चि. यश यास श्री. रविराज यादव सर, स्टार तायक्वांदो अकॅडमी यांचे मार्गदर्शन लाभले .
प्रशिक्षक यादव सर तसेच आईवडिलांचे सतत असणारे प्रोत्साहन यामुळेच ब्राँझ पदका पर्यंत मजल मारल्याचे यशने एस डब्ल्यू न्यूज शी बोलताना सांगितले. तायक्वांदो स्पर्धे मध्ये भारताचे नाव उज्वल करण्याचे स्वप्न असल्याचे यशने सांगितले .
विविध स्तरातून यश वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .


