श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री महादेव शिंदे यांचे कडून रु ५,०००/ ₹ देणगी

श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री महादेव शिंदे यांचे कडून रु ५,०००/ ₹ देणगी
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ११/ श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन
भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
आज रविवार दिनांक११.०५.२०२५. रोजी श्री कमला भवानी साडी सेंटर श्री महादेव रामा शिंदे रा. जातेगाव. यांचे कडून रु. ५,०००/ रोख देणगी मंदीर जतन संवर्धन कामास प्राप्त झाली आहे. तसेच श्री भरत पगार रा नाशिक यांचे कडून ऑनलाइन रु १०००/ देणगी प्राप्त झाली आहे. मंदिर समिती तर्फे या निमित्त श्री कमला देवी मंदिर समिती कडून पुजारी सहदेव सोरटे, अशोक गाठे व्यवस्थापक यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधाही उपलब्ध आहे.
*देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४*