Breaking
ब्रेकिंग

अमळनेरातील एक कोचिंग क्लास जेथे अभ्यासाबरोबर संस्कारही रुजतात…

0 3 9 0 2 6

अमळनेरातील एक कोचिंग क्लास जेथे अभ्यासाबरोबर संस्कारही रुजतात…

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य
साधून साई इंग्लिश अकॅडमि,
अमळनेर व वनविभाग, सामाजिक
वनीकरण विभाग, अमळनेर व
वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त
विद्यमाने एक प्रेरणादायी उपक्रम
राबवण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केवळ रोपेच नाही मिळाली.
तर मिळाले एक भान –
पर्यावरणाबद्दल, आपली जबाबदारी
ओळखण्याचे!

“हे रोप आम्ही आमच्या शेतात लावणार… रोपाचा वाढदिवस त्याच्यासोबत साजरा करणार” – हे विद्यार्थ्यांचे उद्गार सांगतात, साई इंग्लिश अकॅडमि विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नव्हे तर मूल्येही रुजवत
आहे.मुख्य अतिथी वनपाल गुलाब पिंजारी सरांनी सांगितले की, “वृक्षारोपण ही आजची काळाची गरज आहे-कारण वृक्ष म्हणजेच जीवनाचा आधार!”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमिचे
संचालक भैय्यासाहेब मगर यांनी केले.विद्यार्थिनी कल्याणी पाटीलने सादर केलेल्या घोषवाक्यांनी कार्यक्रमात सजीवतेची भर घातली.

साई इंग्लिश अकॅडमि म्हणजे केवळ इंग्रजी शिकवणारा क्लास नाही, तर एक मूल्याधिष्ठित शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांचे चरित्र, जबाबदारी व समाजशीलता घडवली जाते.
विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक आणि
वनअधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती, हीच या उपक्रमाच्या यशाची ग्वाही!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे