Breaking
ब्रेकिंग

साई सेवा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप येवले तर व्हा. चेअरमनपदी प्रा.विलास मुसमाडे यांची निवड

0 4 3 3 3 2

साई सेवा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप येवले तर व्हा. चेअरमनपदी प्रा.विलास मुसमाडे यांची निवड

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी फॅक्टरी येथील साई सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रदीप लक्ष्मण येवले तर व्हॉइस चेअरमनपदी प्रा.विलास भाऊसाहेब मुसमाडे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

साई सेवा पतसंस्थेसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. आज सोमवार संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.

चेअरमन पदासाठी प्रदीप लक्ष्मण येवले यांच्या नावाची सूचना दत्तात्रय गाडे यांनी मानली तर बाळासाहेब तुपे यांनी अनुमोदन दिले.व्हा.चेअरमनपदासाठी प्रा.विलास मुसमाडे यांच्या नावाची सूचना शिवाजी बंगाळ यांनी मांडली तर त्यास दत्तात्रय गाडे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी शिवाजी बंगाळ,दत्तात्रय गाडे, मनोहर ढुस, केरू वाघ, महानंदा कदम, सुलोचना भवाळ, श्रीनिवास शिंदे, बाळासाहेब तुपे,राजेंद्र बिडगर, यांची संचालक पदी निवड करण्यात आली.

प्रसंगी योगेश येवले,संस्थेचे व्यवस्थापक मयूर जोशी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे