Breaking
ब्रेकिंग

निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा देदीप्यमान निकाल. इ १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे १००% यश…!*

0 7 6 9 4 3

*निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा देदीप्यमान निकाल. इ १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे १००% यश…!*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

पाचोरा – मार्च २०२५ मध्ये सी.बी.एस.ई. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षांमध्ये निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा आणि पाचोऱ्याचा गौरव वाढवला आहे. इयत्ता १०वीच्या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यातील २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून गुणवत्तेचा नवा उच्चांक गाठला आहे. या परीक्षेत कु. पार्थ मंगेशराव काळे याने ९७.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. श्रुतिका संदीप पाटील हिने ९५.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. रीनाज राजू पटेल व कु. संकेत विनायक पवार या दोघांनी ९४.४०% गुण मिळवून संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता १२वीच्या परीक्षेत कु. हिमांशू अशोक सोनवणे याने ८०.८०% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. अथर्व अश्विन वाघ याने ७१.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक आणि कु. गायत्री कन्हैयालाल वाधवानी हिने ६५.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशाली ताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या अभ्यासक्रमातील सुसंगतता, शिक्षकांचे मेहनती मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत या घटकांमुळे हे यश शक्य झाले असून निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा नवा आदर्श प्रस्तुत केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे