श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मंगळवार दि.२७ मे रोजी श्रीरामपूरात
पालखी दर्शन व महाआरतीचा सोहळ्याचा लाभ घेण्याचे श्री स्वामी भक्तांना आवाहन

श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मंगळवार दि.२७ मे रोजी श्रीरामपूरात
पालखी दर्शन व महाआरतीचा सोहळ्याचा लाभ घेण्याचे श्री स्वामी भक्तांना अवाहन
राहुरी जावेद शेख
सालाबादप्रमाणे या २८ व्या वर्षीही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट न्यासा च्या वतीने अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे दर्शन व सेवा सबंध महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी पादुका परिक्रमेचे आयोजन केले आहे, तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या अबालवृद्ध महिला स्वामी भक्ताना श्रीं च्या दर्शनस्तव इच्छा असूनही स्वामींच्या निवासस्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अश्याना दर्शन देण्यासाठी व सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच आपल्या गावी येत आहेत या योगे श्री स्वामी चरणी निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी आपणास प्राप्त होत आहे. श्री स्वामी पालखी चे आगमन आपल्या श्रीरामपूर शहरात मंगळवार दिनांक २७ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता होणार असून दुपारी ४ वाजता पालखी रवाना होणार आहे,
या चार तासात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दर्शन, प्रसाद आणी महाआरतीचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, श्रीरामपूर यांचे तर्फे विनंती करण्यात आली आहे.
सदरील पादुका पालखी कोल्हार येथून सूतगिरणी रस्ता,मेनरोड,श्रीराम मंदिर रोड मार्गे व्यापारी मंगल कार्यालय डावखर रोड श्रीरामपूर याठिकाणी दुपारी १२ वाजता पोहोचून पालखी दर्शन व महाआरती सोहळा संपन्न होणार आहे, तरी पंचक्रोशीतील श्री स्वामी भक्तांनी पालखी दर्शन, महाप्रसाद आणी महाआरती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी, स्वामी भक्त, महिला मंडळ ,भजनी मंडळ, तरुण मंडळ आदिंनी केले आहे.