कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांचे वेतन थकले ? युवा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांचे वेतन थकले ?
युवा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर तांबेपपुरा येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात युवा सेना आक्रमक झाली असून, येत्या ८ दिवसात वेतन अदा न केल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत युवा सेनेच्या वतीने अमळनेर गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे देऊन जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन पाठवण्यात आले असून . निवेदनात नमूद केल्यानुसार, श्री शिवाजी हायस्कूल तांबेपुरा येथील कर्मचारी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील त्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. संबंधित वेतनाची बिले लॉगिनमध्ये उपलब्ध असूनही, कोणत्याही लेखी आदेशाशिवाय ती रोखून धरण्यात आली आहेत, असा आरोप युवा सेनेने केला आहे.

शिक्षकांवर उपासमारीची वेळ वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकले असून दैनंदिन खर्च भागवणे देखील कठीण झाले आहे. “पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर अशी वेळ येणे ही प्रशासनासाठी लाजीरवाणी बाब आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम युवा सेनेने पत्राद्वारे मागणी केली आहे की, सात महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे. जर पुढील ८ दिवसात सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर होणाऱ्या तीव्र आंदोलनाला आणि कायदेशीर परिणामांना प्रशासन सर्वस्व जबाबदार राहील, असा इशारा तालुका प्रमुख राहुल भास्कर कंजर आणि शहर प्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी जळगाव यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहेत.



