Breaking
ब्रेकिंग

शिंदेगटाचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची बाजी मारून दणदणीत विजय

0 3 9 0 3 1

शिंदेगटाचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची बाजी मारून दणदणीत विजय

अमळनेर /  प्रतिनिधी : पंकज पाटील

चोपडा :- चोपडा विधानसभा राखीव मतदारसंघात उबाठाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे तर शिंदे गटाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यात समोरासमोर लढत होती. यात शिंदेगटाचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी बाजी मारून दणदणीत विजय मिळवला आहे. विकास कामाचा जोरावर प्रा. सोनवणे यांचा विजय झाला. गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. चोपडा विधानसभा क्षेत्रात प्रथम फेरीला प्रभाकर सोनवणे हे आघाडीवर होते. मात्र दुसऱ्या फेरीपासून प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आघाडी घेतली व ती आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवली. २४ फेरी अखेर प्रा. चंद्रकांत सोनवणे हे ३२ हजार ३१३ आघाडी घेऊन विजयी झाले. तर प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना एकूण १२२८२६ मते मिळाली असुन प्रभाकर सोनवणे यांना ९०५१३ मते मिळाली. युवराज बारेला – १२९५, सुनिल भिल्ल १६०१ मते, अमित तडवी ५९८ मते, अमीनाबा तडवी ३२४ मते, बाळु कोळी ३३१ मते, संभाजी सोनवणे ५६२ मते, हिरालाल कोळी २११८ मते मिळाली आहेत. तर २४२० इतक्या मतदारांनी नोटाला मतदान केले. फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे