महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात ‘स्नेहबंध’ यशस्वी : सीईओ – मोरे
स्नेहबंध'तर्फे आयोजित गौरी गणपती स्पर्धेचे पारितोषिक वितरण
महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात ‘स्नेहबंध’ यशस्वी : सीईओ – मोरे
‘स्नेहबंध’तर्फे आयोजित गौरी गणपती स्पर्धेचे पारितोषिक वितरण
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – गौरी गणपतीच्या देखाव्यातून सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, पर्यावरण तसेच ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटी या माध्यमातून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात स्नेहबंध सोशल फाउंडेशन यशस्वी झाले आहे, असे गौरवोद्गार अहिल्यानगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी काढले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन आयोजित यावर्षीच्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सच्या संचालिका शोभाताई भंडारी, संचालक रुपेश भंडारी, साई ट्रॉफीजचे संचालक सचिन पेंडुरकर, दै. जनप्रवास प्रतिनिधी संजय सावंत, स्नेहल लवांडे, अनुष्का साठे आदी उपस्थित होते.
रुपेश भंडारी परिवाराच्या वतीने या स्पर्धेतील विजेत्या तीन महिलांना पैठणी साडी, ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबवत आहोत. या स्पर्धांना दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम सिमा कानडे, द्वितीय आसावरी वायकर, तृतीय हर्षदा वैद्य.
उत्तेजनार्थ रेखा दिवटे व सिमा भणगे.
. . . . .
‘स्नेहबंध’तर्फे गौरी गणपती स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सीईओ मोरे, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, शोभाताई भंडारी, रुपेश भंडारी, सचिन पेंडुरकर, संजय सावंत, स्नेहल लवांडे.



