Breaking
ब्रेकिंग

नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार : आ. संग्राम जगताप

आमदारकीची हॅटट्रिक करणाऱ्या जगताप यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार

0 3 9 0 2 1

नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार : आ. संग्राम जगताप

आमदारकीची हॅटट्रिक करणाऱ्या जगताप यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार

जिल्हा प्रतिनिधी :  महेश चव्हाण

अहिल्यानगर :   दि 30 शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले. शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी काम करणार आहे, असे प्रतिपादन आमदारकीची हॅटट्रिक संग्राम जगताप यांनी केले. आमदारपदी सलग तिसऱ्यांदा तब्बल ३९ हजार ६१८ मतांना विजयी झाल्याबद्दल स्नेहबध फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व त्यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, तुषार टाक, शुभम तुरे उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, शहरातील सर्वच भागात सिमेंटचे रस्ते झाले आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून शहराचा विकास होणार आहे. आता राहिलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावून शहराच्या सौदर्यात भर घालू. औद्योगिकीकरण, व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच शिक्षण क्षेत्राला चालना देण्यावरही भर राहील.

आमदारांचे मंत्रिपद अभिमानास्पद….

जगताप हे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. आता ते नामदार होवो या त्यांना शुभेच्छा. ते मंत्री होणे ही समस्त नगरकरांसाठी अभिमानास्पद राहील, असे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले .

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे