ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व नमो फाऊंडेशनची बालघर प्रकल्पाला अनोखी भेट
वेदांतचा वाढदिवस बालघरच्या मूलांबरोबर साजरा
ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व नमो फाऊंडेशनची बालघर प्रकल्पाला अनोखी भेट
वेदांतचा वाढदिवस बालघरच्या मूलांबरोबर साजरा
प्रतिनिधी : पौर्णिमा कोमाकूल
नगर : ग्रामीण पत्रकार संघटना व नमो फाऊंडेशन च्या माध्यमातून वेदांत शेळके याच्या वाढदिवसा निमित्ताने
नगरच्या तपोवन रोड येथील बालघर प्रकल्प येथे मुलांना पुलाव व मिठाईचे वाटप करण्यात आले . यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव व नमो बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वायकर व संस्थेच्या सचिव पुनम कानडे उपस्थित होते .
याप्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव संजय वायकर यांनी सांगितले की, बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड हे येथील मुलांसाठी अहोरात्र खुप परिश्रम घेत आहेत . त्यांचे हे सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे . आमच्या पत्रकार संघाच्या संकल्पनेतून गणेश शेळके यांनी वेदांतचा वाढदिवस बालघर येथील मुलांबरोबर साजरा करून एक प्रकारे समाजकार्यच केले आहे . मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की , शिक्षण हे अत्यंत महत्वाचे असून मुलांना जर भविष्यात मोठा अधिकारी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही . तेव्हा तुम्ही खुप अभ्यास करा आणि यश संपादन करा .
याप्रसंगी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवहरी म्हस्के, पत्रकार रफिक शेख,पत्रकार आसावरी वायकर, रेणुका शेळके ,गणेश शेळके, पौर्णिमा कोमाकुल, प्रतीक्षा सद्गुरे व संस्थेचे सर्व माननीय सदस्य उपस्थित होते .