Breaking
ब्रेकिंग

अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणारी महिला राहुरी पोलिसांकडून जेरबंद . . .

0 3 9 0 4 0

अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणारी महिला राहुरी पोलिसांकडून जेरबंद . . .

आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी

विशेष वृत्तसेवा :   जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झालेबाबत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस स्टेशनला दिनांक 23/01/ 2025 रोजी गुरनं. 43/2025 bns कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर पीडित अल्पवयीन अपहरित मुलाचा शोध घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून रेखा शरद पवार हिला ताब्यात घेऊन विचारपूस करता तिने राहुरी पोलीस स्टेशन हद्दीसह अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोऱ्या व इतर चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर महिलेस अटक करण्यात आली. तिच्याकडे गुन्ह्या संदर्भाने विश्वासात घेऊन विचारपूस करता सदर मोटरसायकल व इतर चोऱ्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचे सांगून, देवळाली येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलास चोऱ्या करायला लावत असल्याचे सांगितल्याने, सदर पीडित अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला विचारपूस करता प्रथम तो काही सांगत नव्हता. परंतु पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर महिलेच्या सांगण्यावरून चोऱ्या करत असल्याची माहिती दिली व चोऱ्या न केल्यास सदर महिला अल्पवयीन मुलास मारहाण करून उपाशीपोटी ठेवत होती. नातेवाईकाला सापडणार नाही या उद्देशाने अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याचे अल्पवयीन मुलाने सांगितले. तसेच तिच्याविषयी कोणी काही तक्रार केल्यास ती त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. अल्पवयीन पीडित मुलास त्याचे आई-वडिलांच्या ताब्यात देऊन गुन्ह्यात bns 142,143(2),143(4) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली. अल्पवयीन मुलाची हकीकत ऐकून त्याच्या आईचे अश्रू अनावर झाले होते. आरोपी महिला रेखा शरद पवार राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी हिला सदर गुन्ह्यात वर्ग करून घेऊन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाकडून आरोपी महिलेस दिनांक 10/02/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी सहाय्यक सरकारी अभियोगता श्री. गागरे साहेब यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ. गणेश लिपणे, महिला पोहेकॉ. स्वाती कोळेकर, महिला पोकॉ. मीना नाचन हे करत आहेत.

अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलां, मुलींना पळून आणून त्यांच्याकडून चोऱ्या, किंवा इतर काही कृत्य करून घेत असल्याची माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क करावा. असे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे .
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोउपनि. धर्मराज पाटील, महिला पोउपनि. ज्योती डोके, सफौ. तुळशीराम गीते, पोहेकॉ. संदीप ठाणगे, पोहेकॉ. बाबासाहेब शेळके, पोना. प्रवीण अहिरे, पोना. प्रवीण बागुल, पोकॉ. गणेश लिपणे, पोकॉ. जयदीप बडे, पोकॉ. सचिन ताजने यांच्या पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे