कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर पूर्णत: अवलंबून न राहता शारीरिक क्षमतांचा अधिक विकास करा- अॕड. संदीप सुरेश पाटील

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर पूर्णत: अवलंबून न राहता शारीरिक क्षमतांचा अधिक विकास करा- अॕड. संदीप सुरेश पाटील
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
चोपडा :- चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विविध क्षेत्रात आणि विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, डाॕ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा चे प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, शाळा समन्वयक डी. एस. पाटील, डी. जी. सोमाणी, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर अनिकेत किरण महाजन या माजी विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली. या उज्वल यश संपादन केल्यानिमित्त अनिकेत महाजन आणि त्याच्या पालकांचा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला दिव्यतेज अतुल पाटील या विद्यार्थ्याने राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केले. जुलै महिन्यात व्हिएतनाम या ठिकाणी होणाऱ्या आशियाई पिकल बॉल स्पर्धेसाठी दिव्यतेजची निवड झाली आहे. त्याने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशासाठी अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला आदित्य संजीव बेहरे
हा विद्यार्थी महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे राष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये सहभागी झाला होता. त्याच्या टीमने या टूर्नामेंट मध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. त्याच्या या उल्लेखनीय यशासाठी आदित्य आणि त्याच्या पालकांना सन्मानित करण्यात आले.
नीट (NEET) 2025 या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये तेजस्विनी सुरेश सोनवणे (५२७ गुण), प्रांजल खंडेराव पाटील (४८३ गुण), मानसी ज्ञानेश्वर शिंदे (४७४ गुण), प्रजल बागुले (४७२ गुण), युग महावीर जैन (४६३ गुण ) यांचा समावेश होता.
नीफ्ट ( NIFT) 2025 नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी साठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेण्यात आलेल्या निफ्ट प्रवेश परीक्षेत शाळेची माजी विद्यार्थीनी संचिता संजय बारी हिने राष्ट्रीय स्तरावर ११३८ रँक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यानिमित्त तिचाही सत्कार करण्यात आला.
सीईटी पीसीएम ग्रुप मध्ये हेमांगी पाटील (९८.६१ %), निखिल महाजन ( ९२.८०%), तोशल पाटील (९०.८०% ), हेमंत पाटील ( ८८.७७ %), पूर्वा देसले (८८.२५%), प्राजक्ता चौधरी (८८.२४%), सीईटी पीसीबी ग्रुपमध्ये यश जोशी (९७%), सीईटी नर्सिंग ग्रुप मध्ये कृष्णा चावरे (९०%) या माजी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीच्या फेरीसाठी निवड झालेल्या तुषार चौधरी या माजी विद्यार्थ्यांचे देखील अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील आणि सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि पालक प्रतिनिधी म्हणून संजय रघुनाथ बारी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून अनिकेत महाजन याने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका कल्पना बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.