वेट लिफ्टिंग स्पर्धेत आडसूळ पॉलीटेक्निकचा रितेश खजिनदार प्रथम
वेट लिफ्टिंग स्पर्धेत आडसूळ पॉलीटेक्निकचा रितेश खजिनदार प्रथम
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा
इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट असोसिएशन द्वारे आयोजित आंतरविभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५६ किलो वजनी गटातून रितेश खजिनदार याने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला. वेटलिफ्टिंग स्पर्धेत क्लीन अँड जर्क प्रकारात एकूण सहा फेरी पार करत रितेशने हे यश मिळवले. या स्पर्धेचे आयोजन परिक्रमा फार्मास्युटिकल सायन्स डी. फार्म कॉलेज, काष्टी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. कुस्ती खेळात तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग मधील यश हार्दे याने दुसऱ्या फेरी पर्यंत बाजी मारली. तर द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग मधील शेळके आदित्य हा पहिल्या फेरीत बाद झाला. वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधून बागवान दानीश व भडके अथर्व तसेच प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग मधील जेडिया देवा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत खेळात विशेष प्राविण्य दाखविले.
या स्पर्धेसाठी खेळाडूंना सर्व विभागाच्या विभागप्रमुखांचे प्रोत्साहन लाभले.
आडसुळ पॉलिटेक्निकचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळामध्ये हार -जीत होतच राहते. खेळाडूंनी विजयाच्या आनंदा सोबत, हार सुद्धा स्वीकारून पुढील लक्षावर ध्येय केंद्रित करावे. असे सांगून त्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूवर, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध आडसूळ , सचिव सौ. लिनाताई आडसूळ , डायरेक्टर श्री. कृष्णा आडसूळ , खजिनदार मा. श्री. परमेश्वर आडसूळ यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला. या स्पर्धेसाठी आडसुळ पॉलिटेक्निक मधील सह क्रिडा शिक्षक पठाण पि.जे. व क्रीडा शिक्षक निंबाळकर एस.ए. यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.