Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण….श्रद्धांजली वाहताना नागरिक झाले भावूक…

0 8 6 5 2 1

गुंडेगाव येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण….श्रद्धांजली वाहताना नागरिक झाले भावूक…

वाळकी /  प्रतिनिधी 

स्व.शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.राहुरी – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय लोकनेते माजी आमदार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र शोकसागरात बुडाले आहे.दिनांक १७ ऑक्टोबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.वयाच्या सत्तरीतही ते अत्यंत कार्यतत्पर आणि लोक संपर्कात सक्रिय होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील “आपला माणूस” हरवला आहे.
यावेळी या शोकसभेला गुंडेगावसह संपूर्ण वाडी वस्तीतील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन रावसाहेब कोतकर, वामनराव जाधव गुरुजी,भिवसेन हराळ महाराज भाऊसाहेब कोतकर,नंदराम माने, संदिप भापकर,शंकर हराळ,अशोक पवार,कारभारी आगळे,भानुदास माने,बाळासाहेब पवार, बाळासाहेब जावळे, बापूराव जाधव,सर्जेराव माने,संजय कोतकर शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकारी क्षेत्रातील आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली देताना वामनराव जाधव म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले हे सहकार,शेती व ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेले,तसेच ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. सामान्य जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारे,मोठा जनसंपर्क असणारे होते तसेच गुंडेगाव वरती त्यांचे विशेष प्रेम होते.त्यांनी कधीच गुंडेगावचे कोणतेही काम अडवले नाही.त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गुंडेगाव सहकार क्षेत्रासह नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन यावेळी रावसाहेब हराळ,मा.चेअरमन भाऊसाहेब कोतकर यांनी श्रद्धांजली पर भाषणे केली..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे