Breaking
ब्रेकिंग

निष्ठा व शौर्याचा गौरव : अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा ‘स्नेहबंध’कडून सत्कार

0 8 6 7 3 4

निष्ठा व शौर्याचा गौरव : अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा ‘स्नेहबंध’कडून सत्कार

अहिल्यानगर – महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या निमित्ताने स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी कलुबर्मे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
सन २०२५ या वर्षासाठी मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून, जिल्ह्याच्या कार्यक्षमतेची राज्य स्तरावर दखल घेतली गेली आहे.
अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आपल्या कार्यकाळात निष्ठा, प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अभिनंदन केले.

(स्टेटमेंट)
“अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी निष्ठा, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेमुळे हा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या कार्याचा राज्य स्तरावर झालेला गौरव हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
– ‘स्नेहबंध’ अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे

फोटो ओळ :
अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा ‘स्नेहबंध’तर्फे डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते सन्मान करताना.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे