Breaking
ब्रेकिंग

बडनेरा-नाशिक रोड स्पेशलला कजगाव स्थानकावर थांबा – खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश

0 3 9 0 7 2

बडनेरा-नाशिक रोड स्पेशलला कजगाव स्थानकावर थांबा – खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी :- पंकज पाटील

कजगाव, ता. जळगाव – कजगाव आणि परिसरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बडनेरा-नाशिक रोड स्पेशल (01211/01212) या रेल्वेला कजगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे हा थांबा मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

कजगाव आणि परिसरातील नागरिकांकडून या थांब्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. प्रवाशांना नाशिक आणि बडनेराकडे प्रवास करण्यासाठी लांबच्या स्थानकांवर जावे लागत होते. या समस्येची दखल घेत खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि कजगाव येथे गाडीला थांबा देण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने हा थांबा मंजूर केला आहे.

रेल्वे प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात अधिकृत आदेश लवकरच जाहीर करण्यात येणार असून, प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेने या निर्णयाचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

या निर्णयामुळे व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कजगावमधूनच या गाडीचा लाभ घेता येणार असल्याने वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, खासदार स्मिता वाघ आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालयाने या थांब्याचा नियमित पुनरावलोकन केला जाईल, त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे