पालिका निवडणुकीची महायुती व शहर विकास आघाडी दोन्हीच्या माध्यमातून चाचपणी सुरू

पालिका निवडणुकीची महायुती व शहर विकास आघाडी दोन्हीच्या माध्यमातून चाचपणी सुरू
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असताना आमदार अनिल पाटील यांच्या गटाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सदर निवडणुकीसाठी आमदारांनी महायुती अथवा शहर विकास आघाडी असे दोन्ही पर्याय समोर ठेवले असले तरी यासंदर्भात राष्ट्रवादी काँगेस पक्ष श्रेष्ठी व महायुतीचे आदेश काय येतात यानुसारही ते निर्णय घेणार आहेत.
तसेच संभाव्य इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मते देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच मित्र पक्ष असलेल्या भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत मात्र प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी त्यांनी आतापासूनच सुरू केली असुन कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार सरस ठरू शकतो याबाबत तेथील नागरिकांची मते ते जाणून घेत आहेत.
शासन आदेशानुसार पालिकेकडून प्रभाग
पालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार – आ. अनिल पाटील रचना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून साधारणपणे १ सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर लागलीच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास ऑक्टोबर अखेर मतदान प्रक्रिया पार पडण्याचे संकेत आहेत. अमळनेर शहरात नगरपरिषद असल्याने येथे अ आणि ब असे दोन सदस्य संख्येचे प्रभाग असणार आहेत. नगराध्यक्ष निवड लोकनियुक्तच असेल असे मानले जात असून यासंदर्भात अधिकृत आदेश आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष आरक्षण कोणते निघते यावर देखील निवडणूकीचे महत्व अधिरेखीत होणार आहे. यामुळे या साऱ्या आदेशाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
दरम्यान अमळनेर पालिकेत आतापर्यंत सलग दोन निवडणुकीत आ. अनिल पाटील यांनी निर्माण केलेल्या शहर विकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली असून याहीवेळी ते शहर विकास आघाडी किंवा महायुती दोन्ही पर्याय पुढे करू शकतील असे बोलले जात आहे. एकंदरीत आज स्थितीला सक्षम व दमदार इच्छुक उमेदवारांची टीम त्यांच्या सोबत असल्यांने निश्चितच तगडे आव्हान त्यांचे याही निवडणुकीत राहणार असे स्पष्ट दिसत आहे.